सोलापूर - पवित्र रमजान साजरा करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी मीना बाजारात मुस्लीम आणि हिंदू ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या 60 वर्षांपासून रमजान साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी विक्रीची परंपरा या मीना बाजाराला लाभलेली आहे. सध्या या बाजारात 450 स्टॉल लागले आहेत. या ठिकाणी अत्तर, सुरमा, मेहदी, कपडे, ज्वेलरी, खाद्यपदार्थ, ड्रायफ्रुटस या खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत.
सोलापूर : रमजान ईदनिमित्त मीना बाजारात खरेदीसाठी हिंदू-मुस्लीम ग्राहकांची गर्दी - हिंदू-मुस्लिम
पवित्र रमजान साजरा करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी मीना बाजारात मुस्लीम आणि हिंदू ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.
मीना बाजार सुरू झाला तेव्हा या ठिकाणी फक्त महिलांना प्रवेश दिला जात होता. मात्र, आता हा बाजार सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, विजयपूर, पंढरपूर या भागातील मुस्लीम बांधव दरवर्षी खरेदीसाठी या बाजारात आवर्जून हजेरी लावतात. या ठिकाणी हैदराबादी बांगड्या, मोतीगोट, कंकरगोटसह अन्यही सौन्दर्य प्रसाधने खरेदीसाठी महिला दरवर्षी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. तर पुरुषांसाठी बेल्ट, बूट,पॉकेट, गॉगल्स, स्प्रे, हँडबेल्ट या बाजारात मिळतात.
रमजाननिमित्ताने वर्षातून एकदा भरणाऱ्या यया बाजारात कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. गरीब-श्रीमंतांच्या हक्काची बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेकडे पाहिले जाते. त्यामुळे मीना बाजाराच्या एका छताखाली हिंदू-मुस्लीम एक्याचे दर्शन पाहायला मिळते.