सोलापूर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी झालेल्या या वादळी पावसामुळे शहरातील भवानी पेठेतील एक मोठे झाड घरावर कोसळले. यामध्ये दोन घराचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सोलापूरमध्ये जोरदार पाऊसाची हजेरी, झाड कोसळून 2 घरांचे नुकसान तर जीवित हानी नाही हेही वाचा -निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात
रविवारी मध्यरात्री उशिरा पावसाने जोर धरला. हा पाऊस सुमारे 3 तास चालला. मागील 24 तासांत 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर या पावसामुळे शहरातील जगदंबा चौकातील एका घराची भिंतदेखील पडली.
हेही वाचा -पंतप्रधानांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत...ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांनी धरला ठेका
या मुसळधार पावसाने शहरातील भवानी पेठेतील हॉटेल प्रियंका चौकातील वैदवाडी येथील दोन घरांवर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानीप्रश्नी नगर अभियंता कार्यालयास माहिती दिली असता, प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करेल, असे त्यांनी सांगितले आहे.