महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर परिसरात दमदार पाऊस, पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात - पंढरपूर बातमी

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे.

rain in pandharpur
rain in pandharpur

By

Published : Jul 14, 2020, 6:28 PM IST

पंढरपूर सोलापूर) -पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर मंगळवेढा, सांगोला, माळशिरास या तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपले आहे.

पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ८५ मिलीमिटर पाऊस पडल्याने शहराच्या भोवताली असणारे सर्वच नाले भरून वाहत होते. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस ३३.६५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी (दि.14 जुलै) दुपारी तीन- साडेतीननंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाणी हळूहळू ओसरू लागले. पंढरपूर शहरातील उपनगरातील सखल भागदेखील जलमय झाला. अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचले दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून पावसाला हवा तसा जोर नसल्याने शेतीच्या मशागतीची कामे रेंगाळली होती. मात्र , आता खऱ्या अर्थाने तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details