सोलापूर - संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातील सोलापूरकर केरोनाशी दोन हात करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा चव्हाट्यावर आलाय. प्रशासकीय अधिकारी दारू पार्टी करत असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कोरोनामुळे गाव कोमात... अन् अधिकाऱ्यांची दारू पार्टी जोमात! - solapur district administration
संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातील सोलापूरकर केरोनाशी दोन हात करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा चव्हाट्यावर आलाय. प्रशासकीय अधिकारी दारू पार्टी करत असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
बार्शी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात आली. यासंदर्भात विविध पातळ्यांवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, वैराग ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर तसेच कर्मचारी विलास मस्के (कार्यालयीन अधीक्षक), राम जाधव (बांधकाम अभियंता), अमजद शेख (कारकून) यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच 'ओली पार्टी' केलीय.
जिल्हाधिकाऱ्यांनी वैराग भाग सील करण्याच आदेश दिले आहे. यादरम्यान, संबंधित प्रकार समोर आला. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मद्यपान करतानाचा व्हिडियो व्हायरल झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.