सोलापूर- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 26 डिसेंबर) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यपालांनी आज स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. कोश्यारी हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहे. आज सकाळी राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्यपाल हे अक्कलकोट येथे गेले आणि त्यांना स्वामींचे दर्शन घेतले.