सोलापूर -पोलिसांनी गनिमी कावा या युक्तीने आंदोलकांना चकमा दिला आहे. राज्यपालांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वामीधाम येथून विद्यापीठकडे रवाना होताना नवी शक्कल लढविली. गनिमी कावा करत रिकामा ताफा सोलापूर विद्यापीठाकडे रवाना केला. ( Governor's Solapur Visit ) आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्गवर या रिकाम्या ताफा रोखण्याचा प्रयत्न केला तसेच निषेधार्थ घोषणा दिल्या. ( governor solapur visit shivpremi protest ) मात्र, त्यात राज्यपाल नसल्याने आंदोलकांची एकच धांदल उडाली होती.
राज्यपालांना जुने सोलापूरकडे जाताना भगवे झेंडे दाखवून निषेध -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सोलापुरात हेलिकॉप्टरने सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. स्वामी धाम (जुळे सोलापूर) येथे ते आपल्या ताफ्यासह रवाना होताना, आसरा चौक येथे जात असताना, शेकडो शिवप्रेमींनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड हजार पोलिसांच्या फौजफाट्याने या शिव भक्तांना रस्स्त्यावर येऊ दिले नाही. ताफा जात असताना आंदोलकांनी भगवे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत निषेधार्थ घोषणा दिल्या.
राज्यपाल हेलिकॉप्टरने विद्यापीठाकडे रवाना -