महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलीने प्रेमविवाह केल्याने मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण, मंगळवेढ्यातील घटना

भाळवणी गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेवून लग्न केले. याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून तीन किमी अंतरापर्यंत दोरीने बांधून आणत मारहाण केली.

father
मुलाचे वडील

By

Published : Aug 11, 2020, 3:21 PM IST

Updated : Aug 11, 2020, 5:22 PM IST

सोलापूर -मंगळवेढ्यातील भाळवणी गावात मुलाने प्रेमसंबंधातून मुलीला पळून नेले व लग्न केले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

भाळवणी गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेवून लग्न केले. याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून तीन किमी अंतरापर्यंत दोरीने बांधून आणत मारहाण केली. त्यानंतर गावातील चौकात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला बांधून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे गावात गोंधळ उडाला व गावकऱ्यांची गर्दी उसळली. गावातील काही लोकांनी हस्तक्षेप करून मुलाच्या वडिलांची सुटका केली.

प्रेम विवाह करणाऱ्या मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण

गावातील लोकांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत. नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहे.

Last Updated : Aug 11, 2020, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details