महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

त्याने हट्टच केला! मग काय, पोलिसाचा ड्रेस घालूनच केली गणेशाची स्थापना - Ganesha established

माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी गणेश उत्सव मंडळाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाची बैठक घेऊन पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील गणेश मंडळांना घरीच गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देखील मिळताना दिसून आला.

Ganesha established by a small child  by wearing a police dress
त्याने हट्टच केला! मग काय, पोलिसाचा ड्रेस घालूनच केली गणेशाची स्थापना

By

Published : Sep 11, 2021, 4:57 AM IST

सोलापूर (माढा) - माढा शहरासह परिसरातील गावात अगदी साध्या पध्दतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेशाच्या मूर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी गर्दी झाली होती. कोरोनाचे भान ठेऊन मास्क लावत सोशल डिस्टिसिंगचा अवलंब करीत बाजारपेठेत खरेदी करताना ग्राहक दिसून आले.

प्रतिसाद देखील मिळला

माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी गणेश उत्सव मंडळाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाची बैठक घेऊन पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील गणेश मंडळांना घरीच गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देखील मिळताना दिसून आला. पोलीस स्टेशनच्या ३८ गावांत एकूण २९ मंडळे स्थापना झाली आहेत. विशेष म्हणजे २३ गावात सार्वजनिक मंडळाची स्थापनाच झालेली नाही. तर, ११ गावात १ गाव १ गणपती संकल्पना अस्तित्वात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी या गणेश मंडळाचे कौतुक केले आहे.

गणवेशाचा आग्रह धरला

माढा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी चंद्रकांत गोरे यांचा तीन वर्षाचा मुलगा वेदांतने वडिलांचा पोलीसी खाकी ड्रेस घालूनच गणरायाची घरी स्थापना केली.वेदांतने वडिलांकडे पोलिसाचा ड्रेस घातल्याशिवाय गणरायाची स्थापना करायची नाही. असा आग्रह धरला. मग काय वडिलांनी मुलगा वेदांतला ड्रेस परिधान केला. गणरायाची स्थापना करीत "बप्पा मला पोलीस होण्यासाठी आशिर्वाद द्या" असे म्हणत वेदांतने गणेशाचे वंदन देखील केले. हा क्षण पाहून वेदांतचे आई, वडील गहिवरल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details