सोलापूर- पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे ४ लाख रूपये किंमतीचा गुटखा गुरुवारी (14 नोव्हेंबर)ला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेला गुटखा हा कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येत होता.
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा 4 लाखांचा गुटखा पंढरपुरात जप्त, दोघे ताब्यात
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे चार लाख रूपये किंमतीचा गुटखा गुरुवारी (14 नोव्हें) जप्त करण्यात आला आहे.
कर्नाटकातून स्कार्पिओ गाडीमध्ये (क्र. एम एच 12 सी व्ही 500) गुटख्यांची मोठ्या प्रमाणात पोती आढळून आली. विविध कंपनीचा 4 लाख रूपये किंमतीचा सुगंधी तंबाखू असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज शंकर गवळ (रा. शिरोली, कोल्हापूर), रवी अशोक ननवरे (रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत अन्न भेसळ अधिकाऱ्यांना बोलावून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.