महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी वरदायिनीः सोलापूर शहराला होतोय चार दिवसाआड पाणीपुरवठा - टँकर

सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या हिप्परगा तलावातील पाणी काही महिन्यापूर्वीच संपलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहराची तहान भागविण्याचे काम उजनी धरण करत आहे. सोलापूर शहर ते उजनी धरण अशी 110 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आलेली असून याच पाइपलाइनद्वारे सोलापूर शहरातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. तर भीमा नदीवरील टाकळी पंप हाऊस येथून सोलापूर शहरातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी भरताना नागरिक...

By

Published : May 27, 2019, 2:59 PM IST

सोलापूर- शहराला सद्या स्थितीमध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला प्रामुख्याने, हिप्परगा येथील तलाव आणि उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने, सद्य स्थितीमध्ये पाणीपुरवठा उजनी धरणातून केला जात आहे. मात्र, उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खलावला असून, प्रकल्पाची पातळी वजा पन्नास टक्के झाली आहे. मृतसाठ्यातील जवळपास २७ टीएमसीहून अधिक पाणी संपले आहे. त्याकारणाने, शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी भरताना नागरिक...

सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या हिप्परगा तलावातील पाणी काही महिन्यापूर्वीच संपलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहराची तहान भागविण्याचे काम उजनी धरण करत आहे. सोलापूर शहर ते उजनी धरण अशी 110 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आलेली असून याच पाइपलाइनद्वारे सोलापूर शहरातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. तर भीमा नदीवरील टाकळी पंप हाऊस येथून सोलापूर शहरातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे.

भीमा नदीवरील टाकळी या ठिकाणी देखील चिंचपूर या बंधाऱ्यामध्ये उजनी धरणातीलच सोडलेले पाणी अडवण्यात येते आणि ते पाणी सोलापूर शहरातील काही भागात सोडले जाते. त्यामुळे सोलापूर शहराची सर्व भिस्त ही फक्त उजनी धरणावर अवलंबून आहे. तर शहरातील काही गावठाण भागामध्ये, सद्या परिस्थितीमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, शहरातील नवी पेठ, दत्त चौक, नई जिंदगी, हस्तुरे वस्ती, टिकेकरवाडी, मजरेवाडी यासह शहरातील अनेक भागामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details