महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावळे रुप मनोहर..! विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास - फुलांची आरास विठ्ठल मंदिर

या आकर्षक सजावटीसाठी साधारणपणे एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी एकूण 51 हजार रुपयेे खर्च करण्यात आला आहे. या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमध्ये पंढरी रायाचे आणि रुक्मिणी मातेचे रुप अधिकच मनमोहक दिसत आहे.

vitthal rukamini
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास

By

Published : Mar 1, 2021, 9:11 AM IST

Updated : Mar 1, 2021, 5:40 PM IST

पंढरपूर - श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघ कृ 2/3 निमित्त विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आणि नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. ही आरास श्रीकांत घुंडरे, काळू राम थोरात यांनी केली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास

1 टन फुलांचा वापर..
माघ कृष्ण 2-3 निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली. यामध्ये शेवंती, झेंडू, बिजली, गुलाब, झलबेरा या फुलांच्या रंगसंगती वापरून आरास तयार करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीसाठी साधारणपणे एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी एकूण 51 हजार रुपयेे खर्च करण्यात आला आहे. या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमध्ये पंढरी रायाचे आणि रुक्मिणी मातेचे रुप अधिकच मनमोहक दिसत आहे.

भाविकांसाठी मूखदर्शन खुले-

विठ्ठल मंदिर समितीकडून 24 फेब्रुवारी पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची सर्व काळजी घेतली जात आहे. मास्कशिवाय मंदिरामध्ये कोणत्या भाविकाला प्रवेश दिला जात नाही.

Last Updated : Mar 1, 2021, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details