पंढरपूर -देशभरात नवरात्र उत्सवाला सुरवात झाली आहे. देशभरातील देवींची मंदिरे नवरात्रीनिमित्त सजली असून पंढरपूरातही घटस्थापनेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभानिमित्त (घटस्थापना) मंदिरात तुळशी आणि पानफुलांची आरास करण्यात आली. तर, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक सुवासिक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील ही सुंदर सजावट पुण्यातील भक्त राम जांभुळकर यांनी केली आहे.
पंढरपूर : घटस्थापनेच्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट
देशभरातील देवींची मंदिरे नवरात्रीनिमित्त सजली असून पंढरपुरातही घटस्थापनेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
पहाटेपासून रखुमाईची पूजा आणि गाभार्याची सुगंधित फुलांनी सजावट करण्यात आल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचे साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाचा गाभारा विठ्ठलास प्रिय असलेल्या तुळशीच्या फुलांनी सजवण्यात आला होता. त्यामुळे हिरव्या गर्दी, सुवासिक तुळशींच्या सुगंधाने विठ्ठलाचा गाभारा प्रफुल्लीत झाल्याचे दिसत होते.
रखुमाईच्या गाभार्यातही मोगरा, जरबेरा, लिली, गुलाब आदी सुगंधित फुलांची सजावट करण्यात आली होती. पुणे येथील रामभाऊ जाभूंळकर यांनी ही सजावट केले. आजवर नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अशा प्रकारे आकर्षक फुलांनी गाभार्यात सजावट केली आहे. मात्र कोरोना महामारीमुळे विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.