सोलापूर- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या लढल्या जाणार असल्याचे सूचक वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. आधी लोकसभा लढू नंतर विधानसभेचे बघू असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शहरातील शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या उपक्रमांच्या शुभारंभासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले होते.
आधी लोकसभा लढू मग विधानसभेचे बघू - विनोद तावडे - mlc
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या लढल्या जाणार असल्याचे सूचक वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नसल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे.
VINOD
पुढे बोलताना ते म्हणाले, की राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या २ स्वतंत्र आचार संहिता लागतील. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या भाषणातील वक्तव्याबद्दल विचारल्यावर त्यांनी हे सूचक विधान केले.
शिक्षणमंत्र्यांच्या या सूचक वक्तव्यावरुन केंद्र आणि राज्याची दोन्ही निवडणूक एकत्र लढण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने तुर्तास लोकसभेची मोर्चेबांधणी केली आहे. पण दोन्ही एकत्र लागल्या तर भाजप सज्ज असल्याचेही तावडे म्हणाले.