सोलापूर- शहरातील पाच्छा पेठ परिसरात राहत असलेला व्यक्ती कोरोनामुळे दगावला आहे. 56 वर्षीय व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा रिपोर्ट आज आला आहे. मृत व्यक्ती ही 10 एप्रिल रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होती आणि काल त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती - सोलापूर कोरोना बातमी
सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आहे. हा रुग्ण दहा तारखेला दाखल झाला होता. काल पहाटे म्हणजे दिनांक 11 रोजी तो मरण पावला. आज दुपारी 3.30 वाजता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे.

रुग्णाचे वय 56 आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर आता सील करणे सुरू केले असून आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबीयांची माहिती घेणे सुरू झाले आहे. दरम्यान, या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.