पंढरपूर ( सोलापूर) -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निंबोणी येथील 33 के.व्ही उपकेंद्रांत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील प्रकल्पास अचानक विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्यालयातील बहुतांश कर्मचारी दिवाळी सुट्टीवर गेले होते. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना म्हणावे तितके यश आलेले नाही.
आगीने भीषण रूप घेतले होते. त्यानंतर साडेचार वाजता अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून हा प्रकल्प उभा करण्यात आला-
सोलर पॉवर जनरेटिंग सिस्टीम यांच्या अखत्यारीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. 657.2 केडब्ल्यूपी क्षमतेच्या महावितरण कंपनीच्या निंबोणी येथील शाखा कार्यालयाच्या शेजारी 33 केव्ही उपकेंद्राच्या बाजूला रिकाम्या जागेत हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज तिथेच 33 केव्ही उपकेंद्रांत पुरवठा केला जात आहे.