सोलापूर (पंढरपूर) -करमाळा तालुक्यातील जेऊर येथे विनापरवाना कोरोनाची चाचणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही चाचणी करणाऱ्या डॉक्टरसह लॅब टेक्निशियनच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : राज्यातील शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
पोलीस प्रशासनाकडून डमी रुग्ण पाठवून केली तपासणी
जेऊर येथे कृष्णाई हॉस्पिटलचे डॉ. हेमंत पांढरे व भोसले लॅबरोटरी हे संगनमताने विनापरवाना कोरोनाची चाचणी करून देत असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी हिरे यांना मिळाली. त्यानुसार करमाळा पोलीस पथकाने डॉ. पांढरे यांच्याकडे डमी रुग्ण पाठवून दिला. त्यानंतर डमी रुग्णाची ॲन्टिजेन टेस्ट करण्याबाबत डॉ. पांढरे यांनी भोसले लॅबोरेटरीच्या नावाने चिठ्ठी लिहून संबंधिताची टेस्ट करण्यासाठी सांगितले होते.
हेही वाचा -जळगावात 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक; वितरणावरील नियंत्रणाचा प्रशासनाचा दावा फोल
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..
वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी याप्रकरणी लेखी अहवाल दिला आहे. डॉ. गायकवाड यांच्या अहवालानंतर कृष्णाई रुग्णालयातील डॉक्टर व लॅब चालकाविरुद्ध परवानगी नसतानाही कोविड-19ची टेस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे