सोलापूर - महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवार, १ फेब्रुवारी पासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. (Fifty thousand students in Solapur district) शाळा स्तरावरून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील शाळांमध्ये ५० हजार विद्याथ्यांची उपस्थिती होती. (Municipal Commissioner in Solapur district) कोरोनाची खबरदारी घेत शाळा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शहरातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्वच वर्ग ९ जानेवारीपासून बंद ठेवले होते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरातील बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी आहे.
मुलांना शाळेमध्ये शिफ्टनुसार दिले जाणार
शाळा बंद ठेवून चालणार नाही, असा सूर अधिकारी वर्गातून होता. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील पहिली ते बारावीच्या एकूण ३९८ शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. मुलांना शाळेमध्ये शिफ्टनुसार दिले जाणार आहे. तसेच, शाळा व्यवस्थापनाने आम्ही सर्वतोपरी विद्यार्थ्यांची कोळजी घेणार आहोत अशी हमी दिल्याने शाळा सुरू झालेल्या आहेत. तसेच, पालकांची परवाणगीही यामध्ये महत्वाची आहे.
शालेय प्रशासन कडून लेखी अहवाल-