महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बर्फ गोळे विक्रेत्यांना परवाना बंधणकारक; अन्न-औषध प्रशासनाचा दणका - food certificate

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णेमधल्या ३७ जण आजारी पडले आहेत. त्यामुळे, बर्फाचा गोळा विकणाऱ्याविरोधात आता एफडीए म्हणजे अन्न औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बर्फाचा गोळा विकणाऱ्यांना आता अन्न औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागणार आहे.

बर्फ गोळा विक्रिसाठी परवाना आवश्यक

By

Published : May 19, 2019, 9:53 PM IST

रत्नागिरी- उन्हाचा पारा वाढल्यामुळे शीतपेयांची मागणीत वाढ झाली आहे. अनेकजण रस्त्यावरील बर्फाचा गोळा खातात. परंतु, याच बर्फगोळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णेमधल्या ३७ जण आजारी पडले आहेत. त्यामुळे, बर्फाचा गोळा विकणाऱ्याविरोधात आता एफडीए म्हणजे अन्न औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बर्फाचा गोळा विकणाऱ्यांना आता अन्न औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागणार आहे.

बर्फ गोळा विक्रिसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक

काही दिवसांपूर्वी अन्न औषध प्रशासनाने बर्फ बनवणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाईचा केली होती. गंजलेल्या टाक्या आणि अशुद्ध पाण्यात बर्फ तयार केला जात होता. हाच बर्फ बाहेर खाद्यपदार्थांमध्ये विक्रीसाठी वापरला जात होता. खासकरून बर्फाचा गोळा तयार करण्यासाठी बर्फ वापरण्यात येत होता. त्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे गावात बर्फाचा गोळा खल्याने ३८ जणांना याचा मोठा फटका बसला होता. या सर्वांना उलटी आणि जुलाब झाल्याने या संपुर्ण गावाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे, आता एफडीएने बर्फाचा गोळा विकणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचा परवाना बंधनकारक केला आहे.

बर्फ गोळा विक्रेत्यांना १०० रुपयात १ वर्षाचा परवाना दिला जाणार आहे. या परवान्यामुळे बर्फगोळा विक्रेत्यांची संपूर्ण माहिती अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details