सोलापूर- शहराच्या पूर्व भागातील प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केले आहे. मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी रक्तदान करून व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर मुलगी झाल्यावर देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देईन असा संकल्प त्यांनी केला होता. तो अर्ज भरून त्यांनी महापालिकेत योगीन गुर्जर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
रक्तदान करून केले मुलीच्या जन्माचे स्वागत; देह-नेत्र दानाचाही केला संकल्प
शहराच्या पूर्व भागातील प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केले आहे. मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी रक्तदान करून व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज देखिल भरुन दिला आहे.
प्रेम सातलगाव आणि सविता यांना काल (शनिवारी) पहाटे कन्यारत्न झाले. त्यांना एक मुलगा सुध्दा आहे. मुलगी झाली तर मी नक्की रक्तदान करेन आणि मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देईन, असा संकल्प प्रेम सातलगाव यांनी व्यक्त केला होता. आज त्यांना मुलगी झाली. केलेला संकल्प पुर्ण करण्यासाठी त्यांनी सकाळी रक्तदान केले. त्यानंतर महापालिकेत येऊन योगीन गुर्जर यांच्याकडे देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज सादर केला.
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर, चार्टड अकाऊंट धीरज जवळकर, अल्लाउद्दीन तांबोळी, विजयकुमार निरोळे आदी उपस्थित होते. प्रेम सातलगाव यांनी उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.