महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१ वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पिता-पुत्राची सोशल मीडियामुळे झाली पुन्हा भेट

एका हरवलेल्या पित्याला सोशल मीडियामुळे त्याच्या मुलाला पुन्हा भेटता आले.

UP Father-son meet after 1 YEARS due to social media
१ वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पिता-पुत्राची सोशल मीडियामुळे झाली पुन्हा भेट

By

Published : Sep 28, 2020, 8:28 AM IST

Updated : Sep 28, 2020, 9:27 AM IST

सोलापूर - एका हरवलेल्या पित्याला सोशल मीडियामुळे त्याच्या मुलाला पुन्हा भेटण्याचा योग आला. वयस्कर झालेल्या पित्याला त्याचा घरचा पत्ता देखील नीट सांगता येत नव्हता. त्यामुळे त्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु सोशल मीडियाचा उपयोग करून त्या पित्याला अखेर रविवारी त्याच्या पुत्राच्या ताब्यात देण्यात आले. सोलापुरातील बेघर निवारा केंद्राने वयस्कर झालेल्या संदीपसिंग यांचा संगोपन करून सुखरूप त्यांच्या मुलाच्या स्वाधीन केले आहे.

वयस्कर संदीपसिंग हे मूळचे उत्तर प्रदेश येथील आहेत. तर मुलगा ओमसिंग हा देखील उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. उत्तर प्रदेश येथून कशा प्रकारे सोलापूरात दाखल झाले होते, हे देखील संदीपसिंग यांना सांगता येत नव्हते.

सोशल मीडियामुळे पिता-पुत्राची भेट

लॉकडॉउन काळात शहर परिसरातील बेघरांसाठी आणि इतर राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बेघरांसाठी सोलापुरात बेघर निवारा केंद्राची शासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. याच दरम्यान सोलापूरच्या रेल्वे स्टेशन परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेदरम्यान संदीपसिंग उर्फ खंडेलसिंग हे गृहस्थ मिळून आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल केले होते.

मागील सात महिन्यापासून संदीपसिंग उर्फ खंडेलसिंग हे बेघर निवारा केंद्रात होते. दरम्यात सोलापूर महानगरपालिकेने याबाबत सोशल मीडियावर संदीपसिंग यांबद्दल माहिती प्रसारित केली होती. ही माहिती उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या संदीपसिंग उर्फ खंडेलसिंग यांचा मुलगा ओमसिंग यांनी पाहिली आणि त्यांनी सोलापूर महापालिकेशी संपर्क केला. व्हिडीओ कॉल मार्फत त्यांनी वडिलांशी संभाषण केले आणि वडिलांना भेटण्यासाठी तातडीने विमानाने सोलापुरात दाखल झाले. तब्बल 1 वर्षानंतर पिता पुत्राची भेट घडली. ज्या पद्धतीने ते वडिलांना घरी सांभाळत त्याच पद्धतीने सोलापूर महापालिकेने देखील वडिलांना योग्य रित्या सांभाळल्याचे पाहून पालिकेचे बेघर निवारा केंद्र आपल्यासाठी देव असल्याच्या भावना ओमसिंग यांनी व्यक्त केल्या.


कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?, म्हणण्याची डॉक्टरांवर वेळ

Last Updated : Sep 28, 2020, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details