सोलापूर - जिल्ह्यातील जिल्हा दूध संघ वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धडपड सुरू आहे. सोलापूर जिल्हा दूध संघामध्ये संचालक मंडळाच्या काळात कामकाजामध्ये अनियमितता व अपहार झाल्यामुळे शासनाने दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून 8 मार्च 2021 पासून प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. प्रशासकीय मंडळाच्या कामकाजामुळे जिल्हा दूध संघात व व्यवस्थापनात सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघात काही उपद्रवी राजकीय लोक अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळे दूध संघातील प्रशासकीय अधिकारी ठेवूनच कामकाज करावा अन्यथा दूध संघ डबघाईला येऊन बंद पडेल, असे सांगत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दुध संघ वाचवण्याची जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या टेम्भुर्णी येथील प्रकल्प एका खासगी दूध डेअरी कंपनीने भाडेतत्त्वावर मागितला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने तो दिला नाही. तालुका स्तरावर तालुका संघ निर्मिती करून जिल्हा दूध संघ फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्हा दूध संघ स्थापनकरून तालुका पातळीवर जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.
कोरोना काळात दूध संघाचा शेतकऱ्यांना आधार