महाराष्ट्र

maharashtra

प्रशासनाचा तुघलकी कारभार,'सन्मान निधी' न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

पाचशे रुपयाच्या पाणीपट्टीसाठी शेतकऱ्याची जमीन सरकारजमा केली होती. पाणीपट्टीची रक्कम व्याजासह भरून देखील सरकारजमा केलेली स्वमालकीची जमीन परत न मिळाल्यामुळे सरकारी कामकाजाला कंटाळलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

By

Published : Feb 28, 2019, 10:55 AM IST

Published : Feb 28, 2019, 10:55 AM IST

Updated : Feb 28, 2019, 12:37 PM IST

Solapur

सोलापूर- पंतप्रधानांनी जमा केलेले सन्मान निधीचे पैसे गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, वयोवृद्ध शेतकऱ्याला त्याची शेतजमीन सरकारजमा असल्यामुळे हे पैसे मिळाले नाहीत, या नैराशातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात घडली असून सिद्धाराम विभुते, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

विभुतेंची मुस्ती गावात त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावर जमीन होती. मुस्ती गावाच्या वरील बाजूस हरणा तलाव आहे. या तलावातील पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे पाटबंधारे विभागाने ५०० रुपयांची पाणीपट्टी लावली होती. या शेतकऱ्याला ५०० रुपयांची पाणीपट्टी भरणा न झाल्यामुळे जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाने या शेतकऱ्यांची जमीनच ५०० रुपयाच्या पाणीपट्टीसाठी सरकार जमा करून टाकली.

'सन्मान निधी' न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

या शेतकऱ्याला शेतजमीन सरकारजमा झाल्याचे कळल्यानंतर त्याने सरकारी कार्यालयाच्या वर्षानुवर्षे खेटा मारल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. १९८२ साली पाणीपट्टी न भरल्यामुळे शेतजमीन सरकारजमा केली गेली आणि त्यानंतर शेतकऱ्याने ५०० रुपयाच्या पाणीपट्टीचे व्याजासह पैसेही सरकारी तिजोरीत जमा केले. पाणीपट्टीचे पैसे व्याजासह भरल्यानंतरही स्वमालकीची जमीन स्वतःच्या नावावर होत नसल्यामुळे विभुते कुटुंबीय कंटाळून गेले होते.

जमीन स्वतःच्या मालकीची असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही जमीन सरकारजमा झाली. प्रत्यक्षात विभुते कुटुंबीय शेतजमीन कसत होते. मात्र, सातबाऱ्यावर सरकारचे नाव होते, या सर्व प्रकारामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने जेवढ्या काही योजना दिल्या. त्या सवलती दिल्या त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील अनेक वर्षापासून विभुते कुटुंबीय सरकारचे नाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या नावावर थेट पैसे जमा केले. पंतप्रधानांनी जमा केलेले हे पैसे सिद्धाराम विभुते यांना मिळाले नाहीत. कारण, स्वमालकीची असलेली जमीन सरकारजमा झाली होती. गावातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली. मात्र, आपण शेतात काबाडकष्ट करूनही आपल्या नावावर जमीन नाही यामुळे खचून गेलेल्या सिद्धाराम विभूते बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

विभुते शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सरकारी यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विभुते यांचा मुलगा व मुस्ती गावातील नागरिकांनी केली आहे.

Last Updated : Feb 28, 2019, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details