सोलापूर - सध्या 'शेतकरी नवरा नको गं बाय', अशी स्थिती असताना माढा तालुक्यात एका शेतकरी नवरदेवाने त्याच्या नववधुला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले होते. उपळाई (बुद्रुक) येथील दिपक देशमुख यांची कन्या ऐश्वर्या हिचा कासेगाव ता. पंढरपूर येथील नितीन बाबर या शेतकरी मुलाशी विवाह होणार आहे. आज (९ जून) त्यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडणार आहे.
'वावर' आहे तर 'पावर' आहे; सोलापूरच्या शेतकरी नवरदेवाने नवरीसाठी पाठवले 'हेलिकॉप्टर'
ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो. ऐश्वर्याला सासरी पाठवण्यासाठी संपूर्ण गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते. पोलिसांचा फौजपाटादेखील संरक्षणासाठी तितकाच होता.
नितीनचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. तरीही तो आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न घेतो. तर, ऐश्वर्याचेही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतकरीदेखील कुठेही कमी नाही, हे दाखविण्यासाठी स्वतः शेती करणाऱ्या नितीनने आपल्या नववधूला घेऊन येण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले आहे.
ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो. ऐश्वर्याला सासरी पाठवण्यासाठी संपूर्ण गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते. पोलिसांचा फौजपाटादेखील संरक्षणासाठी तितकाच होता. एखाद्या नववधुची अशाप्रकारे पाठवणी होत असल्याचे पाहून गावकरी आनंदी झाले होते.