सोलापूर - अकलूज येथील निहाल बागवान या 26 वर्षीय गिर्यारोहकाचा एव्हरेस्ट मोहीम फत्ते करून परतत असताना ऑक्सिजनअभावी श्वसनाच्या त्रासामुळे निधन झाले आहे. त्यामुळे अकलूज, सोलापूरसह राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
एव्हरेस्टवीराचे निधन ऑक्सिजन अभावी; अकलूजसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला - vijaysingh
गुरुवारी शिखर सर केल्यावर निहालवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. सकाळी साडे सहा वाजता त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला होता. मात्र परत येत असतानाच काळाने निहालवर झडप घातली.
अकलूजच्या निहाल बागवानच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र गिरीशिखरे पादाक्रांत करण्याची त्याची जिद्द मोठी होती. मोहिते पाटलांसह अनेक व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यामुळे निहालने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्णही केले. मात्र अकलूजकरांचा जगातील सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण एव्हरेस्ट शिखर सर करून परतणाऱ्या निहाल बागवानचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प ४ वरच मृत्यू, झाला. त्याच्यासोबत अन्य ३ गिर्यारोहक होते त्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यापैकी एक पुण्याची तर एक दिल्लीची गिर्यारोहक युवती असल्याचे समजते.
गुरुवारी शिखर सर केल्यावर निहालवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. सकाळी साडे सहा वाजता त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला होता. मात्र परत येत असतानाच काळाने निहालवर झडप घातली. ऑक्सिजन अभावी ४ जणांचा गुरुवारी सायंकाळीvij 8 च्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या गाईडकडून मिळाली आहे. निहालच्या मृत्यूची माहिती मिळताच खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत फोन करून संबंधित यंत्रणेला तपासाची विनंती केली. अद्याप चार गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आज निहालच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.