सोलापूर- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 जयंतीनिमित्त गायक मोहम्मद अयाज यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरांना अभिवादन केले आहे. त्यांनी आज बाबासाहेबांच्या जंयतीचे औचित्य साधून 'भीमगाथा' या अल्बमचे ध्वनिमद्रण केले आहे. हा अल्बम 'टी सिरीज' म्युझिक कंपनीद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.
भिमजयंती 129 : आला अंगात रे भीमबाणा...गायक मोहम्मद यांचे बाबासाहेबांना अभिवादन
भीमराया परी भारत भुमीवरी कोणी शोधून दाखवाल का... क्रांती पुन्हां ती घडवाल का... घालू रणात तो धिंगाणा, आला अंगात रे भीमबाणा, अशी स्फुलिंग चेतवणारी, वेगवेगळया प्रकारची गाणी या अल्बममध्ये मुद्रित केली आहेत. तर संगीतकार संदीप बुरे व गीतकार प्रकाश तांबे असून या अल्बमचे सांऊड इंजिनिअर प्रकाश माने आहेत.
भीमराया परी भारत भुमीवरी कोणी शोधून दाखवाल का... क्रांती पुन्हां ती घडवाल का... घालू रणात तो धिंगाणा, आला अंगात रे भीमबाणा, अशी स्फुलिंग चेतवणारी, वेगवेगळया प्रकारची गाणी या अल्बममध्ये मुद्रित केली आहेत. तर संगीतकार संदीप बुरे व गीतकार प्रकाश तांबे असून या अल्बमचे सांऊड इंजिनिअर प्रकाश माने आहेत. ही गाणी मोहम्मद अयाज यांच्या 'भारतीय कला स्टुडिओ'मधे ध्वनिमुद्रण करण्यात आली आहेत.
दरम्यान, सध्या कोरोनामुळे घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणाऱ्या भीमसैनिकांना आणि रसिकांच्या पसंतीला ही गाणी पडतील, अशी प्रतिक्रिया अय्याज यांनी दिली आहे.