सोलापूर - जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाहीचा सण निवडणूक २०१९ निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यात सामूहिक, प्रतिज्ञा, पथनाट्य, घंटागाड्या, स्वाक्षरी मोहीम आदींच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे.
सोलापुरात प्रशासनातर्फे लोकशाहीसाठी जागर कार्यक्रम - madha
सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात जिल्हा स्तरापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत ही जनजागृती केली जात आहे. लोकशाहीचा सण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मी, माझा परिवार, नातेवाईक आणि मित्र परिवाराला या २०१९ च्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञाच दिली आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात १८ लाख ४० हजार मतदार आहेत. तर शेजारच्या माढा लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८६ हजार मतदार आहेत. गत निवडणुकीत ६० टक्के मतदान झाले होते. हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न सोलापूर स्वीप कमिटीने चालवला आहे. त्याला युवा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.