पंढरपूर (सोलापूर) -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदग्रहण समारंभाला सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा जल्लोष देशभर मोठा साजरा झाला असता. परंतु सध्याच्या कोरोनाची महामारी पाहता मोठा जल्लोष साजरा न करता केवळ समाजकार्य व सेवाकार्य करण्याचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यात भाजपा व स्वेरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत मोदींच्या पदग्रहणाचा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; भाजपा व स्वेरी परिवाराच्यावतीने आरोग्य किटचे वाटप - पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट न्यूज
पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात येत आहे. भविष्यकाळात सर्व सुरळीत पार पाडून पूर्वीप्रमाणे चित्र दिसू लागेल. त्यामुळे प्रशासनाला मदत करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी केले आहे.
भाजपकडून वैद्यकीय साहित्यांचे वाटप
भारतीय जनता पार्टी शिक्षण संस्थेचे जिल्हाध्यक्ष व स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्यामार्फेत हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व राबविला जात आहे. लोकांना नेमकी कोणत्या वस्तूची गरज आहे हे ओळखून साहित्य वाटप केले जात आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी थर्मलगन व ऑक्सिमीटरचे वाटप पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील आरोग्य केंद्रात, वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी गिरम, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील वैद्यकीय सेवा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.
भाजपकडून जिल्ह्यात विविध उपक्रम
पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात येत आहे. भविष्यकाळात सर्व सुरळीत पार पाडून पूर्वीप्रमाणे चित्र दिसू लागेल. त्यामुळे प्रशासनाला मदत करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी केले आहे. भाजपाच्यावतीने ११४४ गावांतील तेथील कोविड सेंटरला भेटी देत रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाभर जीवनावश्यक साहित्य वाटप, चहा, नाष्टा संबंधित साहित्य वाटप करण्यात आले. तसेच स्वेरी शिक्षण संस्थेचे डॉ. रोंगे यांच्या कार्याबद्दल आभारही मानण्यात आले.