महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरात ११ ऑगस्टला धनगर समाज आरक्षण मेळावा; प्रियंका गांधी, शरद पवार उपस्थित राहणार - Sharad Pawar

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर नेते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करत आहेत त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे, असे आमदार रुपनवर यांनी सांगितले. पंढरपुरातील मेळाव्याला दोन लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धनगर आरक्षण मेळाव्यासंदर्भात माहिती देताना आ. रामहरी रुपनवर

By

Published : Jul 26, 2019, 11:19 PM IST

सोलापूर- धनगर समाजाचा एसटी प्रर्वगात समावेश करुन सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी मेळावा घेण्यात येणार आहे. येत्या ११ ऑगस्टला पंढरपुरात धनगर हा राज्यस्तरीय मेळावा होईल. मेळाव्याला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील, अशी माहिती धनगर समाजाचे नेते आमदार रामहरी रुपनवर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

धनगर आरक्षण मेळाव्यासंदर्भात माहिती देताना आ. रामहरी रुपनवर

स्वातंत्र्यानंतरही धनगर समाज अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी केल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या साडेचार वर्षात भाजप-शिवसेनेने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. उलट सत्तेसाठी वापर करुन घेऊन समाजाची फसवणूक केली असल्याचे रुपनवर यांनी सांगितले.

धनगर समाजाचा आक्रोश दाखवण्यासाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय भव्य आरक्षण मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातून दोन लाख धनगर समाज बांधव उपस्थित राहतील, असे आमदार रुपनवर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शालीवाहन कोळेकर, माऊली हळणवर, सुभाष मस्के उपस्थित होते.

सर्व संघटना एकत्रित लढा उभारणार-
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समन्वय समितीच्या वतीने पंढरपुरात येत्या 9 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाचे अनेक नेते वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने करत आहेत. या सर्व आंदोलनांना आमचा पाठिंबा राहणार आहे. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे. तेही 11 ऑगस्ट रोजीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान कोणतेही गट तट राहणार नाहीत, असेही आमदार रुपनवर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details