महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनगर समाज आरक्षणासाठी करणार आमरण उपोषण - dhangar community

महाराष्ट्रातील धनगर जमातीचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे. ८ ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर क्रांती दिनाच्या दिवशी (९ ऑगस्ट) पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने आमरण उपोषण करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

पांडुरंग मेरगळ पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना

By

Published : Jul 24, 2019, 10:00 PM IST

सोलापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आमरण उपोषण करणार आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून पंढरपूरमध्ये उपोषणाला सुरूवात होईल असे, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील धनगर जमातीचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे.

पांडुरंग मेरगळ पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना
प्रत्येक सरकारकडून फक्त आश्वासने दिली जातात. अंदाजे दीड कोटी धनगर समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आत्ताचे सरकार धनगर मतदानाचा आधार घेऊन सत्तेवर आले. तरीही सरकारने धनगर आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले आहे. याचा प्रचंड राग समाजामध्ये आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून जनसामान्यांना वेठीस न धरता सनदशीर मार्गाने आम्ही लढा उभारणार आहोत. धनगर आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या यापूर्वी ही मांडलेल्या आहेत. जर ८ ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर क्रांती दिनाच्या दिवशी (९ ऑगस्ट) पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने आमरण उपोषण करणार आहोत, अशी माहिती पांडुरंग मेरगळ यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. संपूर्ण धनगर समाजाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात 'महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच', या संस्थेने याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेच्या आत्तापर्यंत 27 सुनावण्या झाल्या आहेत. शासनाने मराठा समाजाला घटनेमध्ये तरतूद नसतानाही सर्वतोपरी मदत केली. त्याचप्रमाणे आमच्याही याचिकेच्या दररोज सुनावण्या घेऊन, याचिकेचा संपूर्ण खर्च सरकारने करावा. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून द्यावे. अशा मागण्या धनगर समाजाच्या आहेत. यासाठीच पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य धनगर आरक्षण समन्वय समितीचे समन्वयक पांडुरंग मेरगळ यांनी केले. यावेळी धनगर समन्वय समितीचे समन्वयक विठ्ठलनाना पाटील, राम गावडे, शिवाजी देवकाते, बाळासाहेब कोळेकर, मारुती पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details