पंढरपूर (सोलापूर) -तब्बल आठ महिन्यानंतरसोमवारपासून (दि. 16 नोव्हेंबर) मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे करमाळ्यातील श्री कमलादेवी मंदिरामध्ये भक्तांनी रांगोळी, फुले व विद्युत रोषणाई करत आनंदोत्सव साजरा केला. मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होऊ नये, म्हणून स्पीकरवर वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्याचप्रमाणे भक्तांमध्ये विशिष्ट अंतर राहावे, म्हणून बरेच देवीचे भक्त स्वयंप्रेरणेने नागरिकांना अंतर ठेवण्यात प्रोत्साहित करत आहेत. मंदिर उघडल्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील मंदिरे खुली करावी म्हणून महाराष्ट्र सरकार विरोधात बहुजन वंचित आघाडी आणि भाजप या दोन राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.