सोलापूर- येथील वडाळा ग्रामीण भागातील एका डॉक्टरवर पाळत ठेवून त्याचे अपहरण केले. डॉक्टराचे वडाळा ग्रामीण भागात पेट्रोल पंप देखील होते. त्याचे अपहरण करून 5 कोटी रक्कम मागावी असा उद्देश होता. मात्र दरोडेखोरांचा हा उद्देश उधळून लावण्यात आला आहे. फक्त 5 लाख 88 हजार रुपयांची रोकड हाताला लागली. दरोडेखोरांनी डॉक्टरला सोलापुरातुन पूणे येथे घेऊन गेले आणि मारहाण करून पुण्यातच सोडले. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत दरोडा घालणाऱ्या सात जणांच्या आंतरजिल्हा टोळीला चार दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय 47,रा, उत्तर कसबा सोलापूर)असे अपहरण झालेल्या डॉक्टराचे नाव आहे.
मामाच्या मुलाने रेकी करून डॉक्टराचे अपहरण केले -
21 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून तसेच स्वतः च्या मालकीचे पेट्रोल पंप बंद करून राहत्या घरी वेरणा कार मधून डॉ अनिल कुलकर्णी निघाले होते. त्यावेळी दरोडेखोरांनी इनोव्हा कार मध्ये येऊन डॉ अनिल कुलकर्णी यांची कार अडवून मारहाण केली आणि वेरणा कार मधून बाहेर काढून इनोव्हा कार मध्ये बसवले. मोहोळ, पंढरपूर, टेम्भुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे वारजे माळवाडी पुणे येथे नेऊन पेट्रोल पंपाची सर्व रक्कम अशी 5 लाख 88 हजारांची रोखड जबरदस्तीने काढून घेतली. पण यासाठी सराईत दरोडेखोरांमधील एका नातलगाचा वापर केला. हा नातेवाईक सोलापुरातील वडाळा येथे राहावयास होता. म्हणजेच मामाचा मुलगा यास रेकी करण्यास या दरोडेखोरांनी सांगितले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी या दरोड्यातील सात जणांना अटक केली आहे. विकास सुभाष बनसोडे (वय 31 वर्ष, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), सिद्धार्थ उत्तम सोनवणे (वय 42,रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रोहित राजू वैराळ (वय 28 वर्ष, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय 21 वर्ष, रा. साईधाम, ता हवेली, जि पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय 21 वर्ष, रा, जवळा खुर्द, ता कळम्ब, जि उस्मानाबाद), भारत दत्तात्रय गायकवाड (वय 31 वर्ष, वडाळा, ता उत्तर सोलापूर), मुराद हनिफ शेख (वय31 वर्ष, रा. वडाळा ता उत्तर सोलापूर, जि सोलापूर) यांना अटक केली आहे. यामध्ये भारत गायकवाड हा संशयित आरोपी विकास बनसोडे याचा नातलग म्हणजे मामेभाऊ आहे. विकास बनसोडे याने भारत गायकवाड यास रेखी करण्यास सांगितले होते, याने रेकी करून डॉ अनिल कुलकर्णी यांची निवड करून अपहरण करून एक कोटीची रक्कम उकळण्याचा प्लॅन केला होता.
एक कोटीची मागणी -