महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरात 6 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 180 बेडची क्षमता विकसित - pandharpur corona update

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करणे यावर भर देण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे, असे ढोले यांनी सांगितले.

पंढरपूर कोरोना अपडेट
पंढरपूर कोरोना अपडेट

By

Published : Aug 6, 2020, 7:55 AM IST

सोलापूर -कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर शहरातील 6 रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. यापैकी उपजिल्हा रुग्णालयांसह 6 रुग्णालय डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून त्यांची बेडची संख्या 180 आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विठ्ठल रुग्णालय येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर विकसित करण्यात आले आहे.

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करणे यावर भर देण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे, असे ढोले यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील लाईफलाईन, गॅलॅक्सी, गणपती, जनकल्याण, एपेक्स, उपजिल्हा रुग्णालय, विठ्ठल रुग्णालय ही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर रुग्णालय म्हणून सुरु करण्यात आली आहेत. तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी रोहन व निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही खाजगी लॅबना तपासणीसाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याचेही ढोले यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले असून, या पथकामार्फत नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेडिकल असोशिएनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या मार्फत गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणारी इजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यासह तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. संचारबंधीच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन बाधितांचे वेळेत निदान करणे शक्य होईल, असे आवाहनही ढोले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details