पंढरपूर-सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अधिकारी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ५५ ठिकाणी सेंटर चालू झाले असून सेंटर सुस्थितीत चालत आहेत का? किंवा तेथे काही अडचणी असल्यास या सेंटरला भेट देऊन पाहणी करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे. कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याच्या देखरेखीसाठी प्रत्येक सेंटरसाठी एक अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासणीविषयी प्रशिक्षण, तसेच कोविड नियमावली समजावून सांगितली जाणार आहे.
कोविड सेंटरवरील परिस्थितीचा आढावा घेणार
तालुक्यातील सेंटर तपासणीसाठी एक दिवस आणि वेळ निश्चित करून त्या दिवशी अचानकपणे तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सेंटरमधील परिस्थितीचा आढावा घेणे, मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेंटर चालत आहेत की नाही, हे पाहणे. औषधे आणि अन्य सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत का याविषयी पाहणी केली जाणार असल्याच्या सूचना मुख्य अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या आहेत.