महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी, चार जण कोरोना बाधित

पंढरपूर तालुक्यात निर्बंधित वेळेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.

गर्दी
गर्दी

By

Published : May 5, 2021, 8:05 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीमध्ये जे नागरिक बाधित आले त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

42 नागरिकांपैकी 4 जण कोरोना बाधित

पंढरपूर अर्बन बँक येथील परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अचानक नाकाबंदी लावून शहरात विनाकारण फिरणाऱ्या 42 नागरिकांची तपासणी केली असून त्यामध्ये 4 जण कोरोना बाधित आढळून आहेत. त्यांना 65 एकर येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ससंर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. तसेच यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी आरोग्य व पोलीस विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेले सूचनांचे पालन करावे, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी कदम यांनी यावेळी सांगितले.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अचानक कोरोना चाचणी

तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही आरोग्य व पोलीस विभागाचे संयुक्त पथक तयार करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अचानक कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.

हेही वाचा -पंढरपूर : कोरोना बाधितांच्या उपचारावरील बिलांवर प्रशासनाचा अंकुश; 'हा' घेतला निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details