सोलापूर- शहरातील पाच्छा पेठमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 94 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर यातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तर उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.
Coronavirus : सोलापुरात आणखी एक आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - सोलापुरात आणखी एक आढळला कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण
कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 94 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी शनिवारीच ताब्यात घेऊन शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्वांची चाचणी केली असता, एका महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. तपासणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 94 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी शनिवारीच ताब्यात घेऊन शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्वांची चाचणी केली असता, एका महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.