सोलापूर- पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात आणि देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता समाजवाद तसेच लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महागाई गगनाला भिडली - म्हेत्रे
2014 साली नरेंद्र मोदी यांनी 'आप मुझे सत्ता दिजिये, मै महंगाई यू खत्म कर दुंगा', असे महागाई कमी करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत महागाई गगनाला भिडली आहे, असे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.