सोलापूर - गवसु (गलिच्छ वस्ती सुधारणा) विभागातील आकारणी व वसुली अधिकारी माणिकप्रभु लक्ष्मण फुले आणि लिपिक संजय शिवरुद्रप्पा सावळगी यांनी अधिकाराचा गैरवापर केला. त्यामूळे त्यांच्यावर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण -
शहरातील कोनापूरे चाळ या भागातील मनपाच्या मालकीच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करुन घातलेल्या झोपड्यांची वरिष्ठांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता तसेच गवसु (तांत्रिक) विभागाचा अभिप्राय न घेता फुले यांनी आकारणी केली आहे. आरक्षित जागेवर असलेल्या झोपड्यावर कराची आकारणी करुन अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिले. नागरीकांच्या रोषास सामोरे जाण्यास प्रशासनाला भाग पाडले. तसेच त्यांनी भगवान नगर घरकुल योजनेतील 298 लाभार्थ्यांच्या मिळकतीची आकारणी व ज्यांनी खाजगी नळ घेतले आहेत, अशा मिळकतदारांना पाणीपट्टीची आकारणी केली नाही. त्यामुळे फुले माणिकप्रभु लक्ष्मण यांना त्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे सेवेतून तत्काळ निलंबित केले.