सोलापूर- मुंबईच्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे यांच्या सहगायन स्वर सादरीकरणाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले. सोलापुरातल्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्यावतीने प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहगान शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढातल्या स्वरालंकारांनी चिंब भिजली सोलापुरातली मैफल; शास्त्रीय गायनाचे आयोजन - AASHADH
यावेळी शास्त्रीय गायिका ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत या मुंबईच्या दोघी गायिकांनी एकत्रित गायन करत स्वर अलंकारांची मेजवानीच रसिक सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली. या मैफलीच्या निमित्ताने दोन गायिका एकाच वेळी एका रागात करत असलेले स्वरांचे सादरीकरण सोलापूरकर रसिक श्रोत्यांना भुरळ पाडून गेले.
यावेळी शास्त्रीय गायिका ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत या मुंबईच्या दोघी गायिकांनी एकत्रित गायन करत स्वर अलंकारांची मेजवानीच रसिक सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली. या मैफलीच्या निमित्ताने दोन गायिका एकाच वेळी एका रागात करत असलेले स्वरांचे सादरीकरण सोलापूरकर रसिक श्रोत्यांना भुरळ पाडून गेले. हसतमुख मुद्रा दुहेरी सुरांची सोबत रसिकांनी शास्त्रीय गायनातील 'मो मन लगन लागी' या तीन तालातील बंदीश पहिल्यांदाच अनुभवली. दोन गायकांचा एकच सूर, एकच स्वर, एकाच ताल सुरात मिसळलेले तानपुरे आणि तबला तरीही त्यातील वेगळेपणा रसिकांनी अनुभवला.
यमन रागाचा प्रभाव तर इतका पडला की, अनेकांना स्वतःचा विसर पडला. सहगायनातील अविट अनुभव रसिकांनी यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवला. त्यानंतर ख्यालमध्ये ताल, त्रिताल अशी बंदिश... मोरे नयना या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले आणि सोलापूरकर रसिक या मैफिलत चिंब भिजले.