महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी प्रहारचे 'भीक मांगो' - pravin sapkal

महानगर पालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांचे जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतचे थकीत आणि चालू मार्च ते जून २०१९ या कालावधीतील वेतन महानगरपालिका परिवहन विभागाकडे थकीत आहे. यासाठी प्रहारच्या वतीने काम बंद करून भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात परिवहन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

थकीत वेतन मिळावे यासाठी प्रहारच्या वतीने करण्यात भीक मांगो आंदोलनात भीक मागताना कर्मचारी

By

Published : Jun 29, 2019, 1:54 PM IST

सोलापूर - महानगर पालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांचे जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतचे थकीत आणि चालू मार्च ते जून २०१९ या कालावधीतील वेतन महानगरपालिका परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. वेतन लवकरात लवकर द्यावी यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून काम बंद करून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे. यात परिवहन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

थकीत वेतन मिळावे यासाठी प्रहारच्या वतीने करण्यात भीक मांगो आंदोलनात भीक मागताना कर्मचारी आणि माहिती देताना प्रहारचे शहर संपर्कप्रमुख जमीर शेख

या संदर्भात वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार, निवेदने देवूनही महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने नाईलाजाने परिवहन कर्मचाऱ्यांनी प्रहारच्या झेंड्याखाली शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करत भीक मांगो आंदोलन केले आहे. प्रशासन आणि शासनाच्या विरोधात 'भीक मांगो' आंदोलन करत असल्याचे मत शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


एकंदरित पाहता परिवहन कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उपाशीपोटी आत्महत्या केलेली असून एखाद्या कामगाराच्या घरी मयत झाली तर त्याला सावकाराच्या दारात उभे राहून व्याजाने पैसे काढूनच अंत्यविधीचा कार्यक्रम करावा लागत आहे. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून संबंधित परिवहन व्यवस्थापक, कार्यालयीन अधिक्षक, तसेच महापालिका आयुक्तांना वारंवार सांगून कोणताही उपयोग होत नाही. यामुळे, आजपासून काम बंद आंदोलन करत हे भीक मांगो आंदोलन केल्याचे प्रहाकडून सांगण्यात आले. या आंदोलनातून जमा झालेली रक्कम हे प्रशासन आणि शासनाला प्रदान करण्यात येणार आहे.


सदरच्या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार, उपप्रमुख मुश्ताक शेतसंधी, शहर संपर्कप्रमुख जमीर शेख, नवनाथ साळुखे, संभाजी व्हनमारे, शब्बीर नदाफ, सचिन वेणेगुरकर, मुदस्सर हुंडेकरी, अकील शेख, जाबीर सगरी, प्रणव शेंडे, इब्राहिम जमादार, अभिजीत कुलकर्णी, इम्रान शेख तसेच परिवहन कर्मचारी आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details