पंढरपूर- गेल्यावर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काही मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता. काही समाजकंटक पंढरपूरात आषाढी दिवशी साप सोडून चेंगरा-चेंगरी घडवणयाच्या प्रयत्नात होते, अशी सरकारला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाता, घरीच विठ्ठलाची पूजा केली होती. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात येवून विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली आहे.
गेल्यावर्षी 'वर्षा'वर तर यंदा 'पंढरी'त मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा - आषाढी एकादशी
गेल्या आषाढी एकादाशीला मुख्यमंत्री पंढरपुरात पाडुरंगाच्या पुजेसाठी आले नव्हते. कारण लाखो वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याची भिती पसरवली गेली होती.
गेल्या आषाढी एकादाशीला मुख्यमंत्री पंढरपुरात पाडुरंगाच्या पुजेसाठी आले नव्हते. कारण लाखो वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याची भिती पसरवली गेली होती. तसेच मुख्यमंत्री आले तरच साप सोडले जाणार, अशी माहिती होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी महापूजेला पंढरपुरला येण्याचे टाळले होते. तर गेल्या वर्षी आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दांपत्याला मिळाला होता. यावेळी च्या या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.
तर यंदा शासकीय पूजेचा मान अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव तांडा येथील चव्हाण दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल मारुती चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली.