महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : बेगमपूरात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - chhatrapati shivaji maharaj statue removed

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

 सोलापूर
सोलापूर

By

Published : Aug 9, 2020, 7:48 AM IST

सोलापूर - कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पूतळ्याचे दहन केले. मोहोळ तालुक्यातली बेगमपूरमध्ये शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन करत सरकारचा निषेध केला आहे.

सोलापूर

बेळगाव जिल्ह्यामधील मनगुत्ती या गावातील छञपती शिवरायांचा पुतळा हटवल्याप्रकरणी शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे परिसरातील सर्व शिवभक्तांनी कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केले.

सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, जि.प सदस्या शैलाताई गोडसे, भिमा काठ बचाव संघर्ष समितीचे बाळासाहेब सरवळे, भारत माने यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे. यावेळी शिवगडचे रामा सुरवसे,आप्पासाहेब पाटील,वसंत पवार,अरीफ पठाण यांच्यासह शिवप्रेमीनी या आंदोलनात सहभाग घेतला. कर्नाटक राज्यात शिवाजी महाजारांचा पुतळा हटवल्याप्रकरणी मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.

कर्नाटक सरकारने छञपती शिवरायांचा मनगुत्ती या गावामधील पुतळा काढून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. शिवछञपती हे समस्त महाराष्ट्रातील शिवभक्तांची अस्मिता असून कर्नाटक सरकारचा हा अपराध अक्षम्य आहे. आज शिवभक्त रस्त्यावर उतरले आहेत. पण येत्या आठ दिवसात छञपती शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित केला नाही, तर याची झळ कर्नाटक सरकारला सहन होणार नाही, असा इशारा यावेळी शिवभक्तांनी दिला. कर्नाटक सरकारचा पुतळ्याचे दहन केल्यानंतर शिवभक्तांनी कामती पोलिसांना निवेदन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details