महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chennai Surat Greenfield : चेन्नई सुरत ग्रीनफिल्डचा प्रश्न चिघळला, शेतकऱ्यांनी  तोडफोड करत घातला धुडगूस - ग्रीन कॉरिडोर

ग्रीन कॉरिडोर राष्ट्रीय महामार्गासाठी दिला जाणाऱ्या मावेजाची रक्कम एकरी पाच लाख आणि बागायत जमिनीसाठी सात लाख इतके अत्यल्प आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या शासनाचा सुलतानी अधिग्रहण कायदा तातडीने रद्द व्हावा. यासाठी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली आहे.

Solapur News
शेतकऱ्यांनी केली तोडफोड

By

Published : Jun 5, 2023, 8:52 PM IST

सोलापूर: बहुचर्चित चेन्नई सूरत ग्रीनफिल्ड हायवेच्या संदर्भात भुसंपादनाचा विषय दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली आहे. मोबदला आम्हाला मान्य नाही, आमची शेती रस्त्याच्या निर्मितीसाठी देणार नाही असे, वैयक्तिक लेखी निवेदन अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शीच्या हजारो शेतकऱ्यांनी भुसंपादन कार्यालय-११ यांच्याकडे दिले. तर शासन दखल घेत नसल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अत्यल्प मावेजाच्या नोटिशीला जमिनी न देण्याची लेखी हरकत शेतकऱ्यांनी घेतली होती. अक्कलकोटच्या सुरत चेन्नई ग्रीन फील्ड संघर्ष समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले.

एकरी पाच लाख रुपये इतका मोबदला: ग्रीन कॉरिडोर राष्ट्रीय महामार्गासाठी दिला जाणाऱ्या मावेजाची रक्कम एकरी पाच लाख आणि बागायत जमिनीसाठी सात लाख इतकी शासनाने ठरवली आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या शासनाचा सुलतानी अधिग्रहण कायदा तातडीने रद्द व्हावा. महामार्गासाठी एक इंचही जमीन देऊ नये असे आवाहन, यापूर्वी केले आहे. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गासाठी वेगळा राष्ट्रीय महामार्गासाठी वेगळा आणि ग्रीन फील्डसाठी वेगळा कायदा करून शासनाने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली, अशीं भावना शेतकरी व्यक्त केली आहेत.

चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड कॉरिडॉर: सुरत चेन्नई एक्सप्रेसवे हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत, आणखी एक महत्त्वाकांक्षी वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे. द्रुतगती मार्ग सुरत आणि चेन्नई या दोन प्रमुख शहरांना पश्चिम घाटातून जोडतो. सुरत चेन्नई एक्स्प्रेसवेच्या बांधकामामुळे, सुरत आणि चेन्नई दरम्यानचे प्रवासाचे अंतर सध्याच्या 1,600 किमीच्या अंतरावरून 1,270 किमी इतके कमी होईल. पूर्ण झाल्यानंतर हा एक्स्प्रेसवे दिल्ली, मुंबई एक्स्प्रेसवे नंतर दुसरा सर्वात लांब असेल. याशिवाय, चेन्नई सुरत एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेळही सहा तासांनी कमी होणार आहे. हा एक्सप्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या सहा प्रमुख राज्यांमधून जाणार आहे. चेन्नई सूरत एक्स्प्रेसवे ज्या प्रमुख शहरांना स्पर्श करेल त्यात तिरुपती, कडप्पा, कुर्नूल, कलबुर्गी, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics द्रुतगती महामार्गांच्या नामांतर वादाचा प्रवास सुरू श्रेय घेण्याकरिता सत्ताधारीविरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप
  2. Samruddhi Mahamarg Inauguration आता फक्त 6 तासात नाशिककरांच्या दारी येणार नागपूरची संत्रा बर्फी समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्धाटन
  3. Samruddhi Mahamarg Inauguration आता फक्त 6 तासात नाशिककरांच्या दारी येणार नागपूरची संत्रा बर्फी समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्धाटन

ABOUT THE AUTHOR

...view details