करमाळा (सोलापूर) -महाराष्ट्र शासनाने नागरिकांना पास काढून गावी जाण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे अनेक नागरिक पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई रेड झोन असलेल्या क्षेत्रामधून तालुक्यात परतले आहेत. दरम्यान, या नागरिकांना 'ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती'कडून घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. या लोकांनी दिलेल्या कालावधीमध्ये त्याच ठिकाणी राहणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांनी या लोकांची तपासणी केली असता, अनेक लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर करमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत अशा नियम न पाळता बाहेर फिरणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापासूनच शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी पासची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पुणे, मुंबई ठाणे, नवी मुंबई अनेक शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या पाहता या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यासाठी 'ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती'च्या माध्यामातून या नागरिकांची घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे.
क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक नियम पाळून घरीच राहतात की नाही, हे पाहण्यासाठी करमाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी तपासण्या करत असतात. दररोज तालुक्यातील २१ गावे आणि शहरातील ८ वार्डांमध्ये तपासण्या सुरू असल्याची माहिती करमाळा पोलीस ठाण्याने दिली आहे. दरम्यान, वंजारवाडी, खातगाव नंबर 2, जेऊर आणि मलवडी या चार गावांना भेटी दिल्या असत्या काही नागरिक नियम मोडून बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा ६ नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीने क्वारंटाईन केंद्रावरच रहावे, जेणेकरून त्यांच्यामुळे गावातील इतर लोकांना कोरोनाची लागण होणार नाही. तसेच, करमाळा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील किमान वीस ते पंचवीस गावांना रोज भेटी द्याव्यात, तसेच नियम मोडणाऱ्यांनर तत्काळ गुन्हे दाखल करा. अशा सूचना पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिल्या आहेत.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची नावे -