सोलापूर- करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील युवक तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि स्वछता बाळगत रक्तदानाचे शिबिर झाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिरांची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवली होती. राज्यात रक्तचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत गावातील युवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबिराला सुरुवात केली.
सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान हे शिबिर चालले. यावेळी चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगबाबतही व स्वच्छता विशेष काळजी घेतली गेली. यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, माजी सरपंच उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अमित जाकते, रिकी मोरे, सौदागर पाटील, कमलेश चेंडगे, अतुल चव्हाण, दीपक महाडिक, कांतीलाल काळे, अक्षय सुतार, चैतन्य शिंदे, समाधान हाराळे, मेघराज रोकडे, खंडू चेंडगे, नितीन पाटील, केदार आतकरे, नागेश शिंदे, विकी मोरे, उमेश चेंडगे, नंदकुमार पाटील यांनी प्रयत्न केले. शिबिरासाठी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
हेही वाचा -'वडिलांच्या स्मरणार्थ भिंगारे कुटुंबीयांकडून 250 परिवाराला मदत'