सोलापूर-वीज बिल माफीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापुरात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन झाले.भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वागत नगर येथील महावितरण कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन झाले.यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर; भाजप आंदोलकांनी महाविरतणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे - वीज बिल माफीसाठी भाजपचे आंदोलन
लॉकडाऊन काळात राज्य सरकारने १०० युनिट वीज बिल माफ करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल अशी घोषणा केली आहे.
भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
लॉकडाऊन काळात राज्य सरकारने १०० युनिट वीज बिल माफ करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. सोलापूर येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुमठा नाका परिसरातील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. तसेच राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी नगरसेवक श्रीनिवास करली सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घोषणांनी परिसर दणाणला
लाईट बिल माफ करा! या सरकारचा करायचा काय, खाली मुंडी वर पाय ,धिक्कार असो राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी स्वागत नगर परिसर दणाणून गेले होते.