पंढरपूर- भाजपाचे विद्यमान आमदारांसह काही माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले असता, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी हा दावा केला. यावेळी 'बा विठ्ठला राज्यावरील कोरोना संकट दूर होऊ दे' असे साकडे पवार यांनी विठ्ठल चरणी घातले. पवार यांच्यासोबत यावेळी आमदार संजय शिंदे, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक महेश कोठे, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संजय घोडके यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात- रोहित पवार
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार हा जनतेच्या मनातील उमेदवार असेल, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्यात भाजपचे अनेक आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भाजपचे काही आजी माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्क
पंढरपूर मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभारणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार हा जनतेच्या मनातील उमेदवार असेल, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्यात भाजपचे अनेक आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रवेशाबद्दल चर्चेअंती निर्णय होणार असल्याचा खळबळजनक दावा पवार यांनी यावेळी केला.
अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा
पंधरा वर्ष राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यावेळी विज महामंडळाचे वीस हजार कोटी थकबाकी होती, तर भाजप सरकारच्या काळात ती थकबाकी पंचावन्न हजार कोटींच्या घरात गेला. तर कोरोना काळात वीज बिलाची ६५ हजार कोटी रुपये थकबाकी असून. यामुळे राज्यावर आर्थिक ताण पडला आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. परंतु आर्थिक संकट असल्यामुळे व केंद्र सरकार मदत करणार नसल्यामुळे याबाबत सवलत देणे शक्य नसल्याची अप्रत्यक्षपणे पवार यांनी कबुली दिली आहे.