महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना लसीबाबत राज्य सरकारचा खोटा प्रचार'

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.

केशव उपाध्याय
केशव उपाध्याय

By

Published : Apr 9, 2021, 4:39 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना लसीबाबत घाणेरडे राजकारण होताना दिसून येत आहे. देशांमध्ये सर्वाधिक लसीकरणाचा साठा महाराष्ट्राला मिळालेला आहे. मात्र, आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते याबाबत खोटा प्रचार करत असल्याची, टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ उपाध्ये हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर आले आहे. त्यावेळेस त्यांनी ही टीका केली.

हेही वाचा -माता न तू वैरिणी ! पोटच्या पोरीच्या शारीरिक छळाची मांत्रिकाला दिली खुली सूट

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे रोज उघड होत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परबही अडचणीत आले आहेत. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.

राज्य सरकारकडून घाणेरडे राजकारण
महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाबाबत काळाबाजार होताना दिसत आहे. आरोग्य व्यवस्थेत कमतरता दिसून येत आहे. यामुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. आपल्यावरील रोष दुसरीकडे नेण्यासाठी राज्य सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. राज्य सरकारने यामध्ये राजकारण करू नये, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे. देशामधील सर्वात जास्त लस महाराष्ट्राला दिली जात असल्याचा दावाही केशव उपाध्ये यांनी केला आहे.

हेही वाचा -धक्कादायक! हिंगोलीतील प्रेमीयुगुलाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details