सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांकडून 'अब की बार युती २२० पार' असा दावा केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आघाडीच्यावतीने 'काहीही करु पण १७५ यार' असे प्रतिआव्हान दिले जात आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार, असे म्हणायला हरकत नाही.
युतीच्या 'अब की बार २२० पार'ला आघाडीचे 'काहीही करून १७५ यार'चे प्रत्युत्तर - अजित पवार
सत्ताधारी भाजप सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील आणि त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आठवड्यात सोलापूर जिल्ह्याचे दौरे केले. या दौऱ्यात या दोघांनीही परस्परांवर विरोधकांना नामोहरम करण्याचा दावा केला.
या आठवड्यात सत्ताधारी भाजप सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील आणि त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे दौरे केले. या दौऱ्यात या दोघांनीही परस्परांवर विरोधकांना नामोहरम करण्याचा दावा केला. तसेच आपण सत्तेची मॅजिक फिगर कशी गाठू याचाही दावा केला.
राज्यात भाजपने राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे मिळेल त्या मार्गाने इनकमिंग सुरु ठेवले आहे. त्याच बळावर २२० आकडा सांगितला जात आहे. पण राष्ट्रवादीकडूनही १९८० च्या राजकीय परिस्थितीचा दाखला देत ६ चे ६० आमदार केल्याची आठवण करून दिली जात आहे. त्यामुळे त्यावेळी पवारांची सोबत सोडणाऱ्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचे सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देत १७५ आमदार निवडून आणण्याचा दावा केला जात आहे. एकूणच कोण किती पाण्यात आहे हे लवकरच स्पष्ट होईल.