महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीत पोलिसाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा; करमाळ्यात गुन्हा दाखल

संचारबंदी लागू असताना सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करणाऱ्या 23 जणांसह बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यात २४ एप्रिलला रात्री पावणे दहाच्या सुमारास हिसरे शिवारात हा प्रकार घडला आहे.

karmala lockdown violation news
संचारबंदीत वाढदिवस साजरा; करमाळ्यात गुन्हा दाखल

By

Published : Apr 27, 2020, 11:55 AM IST

सोलापूर - संचारबंदी लागू असताना सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करणाऱ्या 23 जणांसह बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यात २४ एप्रिलला रात्री पावणे दहाच्या सुमारास हिसरे शिवारात हा प्रकार घडला आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस शिपायाने देखील यामध्ये सहभाग नोंदवल्याने त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

संचारबंदीत वाढदिवस साजरा; करमाळ्यात गुन्हा दाखल
ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कर्मचारी विनायक रामजी काळे याचा संबंधित प्रकरणात सहभाग आहे. तर गावातीलच विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पवार, विकास ननवरे, बाळासाहेब कोंडलकर, दत्ता टकले, हरी काळे, सतीश ननवरे, अनिल साळुंखे, अंबादास राऊत, हनुमंत पवार, गोरख काळे, योगीराज काळे, बबल्या पवार, नागेश काळे, संतोष काळे, सचिन काळे, नाना काळे, सोमनाथ काळे, किशोर काळे, अंगद काळे, धनाजी काळे, बिभीषण काळे, विनायक काळे, रघुनाथ पवार आदींचा यामध्ये समावेश आहे.
karmala lockdown violation news

तलवारीने 'केक कटींग'

संचारबंदी लागू असताना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी जमवल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. तरीही हिसरे गावातील विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही लोक गोळा झाले होते. त्यांनी हिसरे रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करत असताना नियमांचा भंग करत हातात तलवार घेऊन केक कापण्यात आला. तर गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसानेच यामध्ये सहभाग घेतला. यामुळे त्यावरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तसेच शस्त्र अधिनियम व साथीचे रोग कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी केदारनाथ भरमशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश शिंदे करत आहे.

'व्हॉट्सॲप'मुळे प्रकार उघड..

२४ एप्रिलला वाढदिवस साजरा करत असताना हा प्रकार मित्रांच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यातच स्वतः तैनात असलेला पोलीस कर्मचारी सहभागी असल्याने कोणालाही तक्रार करणे अवघड होते. पण अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये काढलेले फोटो गावातील स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप 'छत्रपती शिवाजी फाऊंडेशन' यावर टाकल्याने हे फोटो पोलिसांपर्यत पोहोचले. यावर कडक पावले उचलत पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या असून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details