सोलापूर- शहरापासून जवळच असलेल्या तळेहिप्परगा या गावात खाणकामगार आणि रोजंदार मजुरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खाणकामगार आणि मजुरांना अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी तळे हिप्परगा येथील भिंगारे कुटुंबीयांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अडीचशे कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले.
लॉकडाऊन झाल्यानंतर शहरात कामाला गेलेले अनेक कुटुंब हे परत गावात परत आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून आपले गाव सोडून गेलेले कामगार हे गावाकडे परतले असल्यामुळे गावात आल्यावर त्यांची मोठी अडचण झालेली आहे. तसेच गावातील काम करणारे देखील हाताला काम नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तळे हिप्परगा येथील भिंगारे कुटुंबीयांनी कामगारांची ही अडचण लक्षात घेऊन गावातील अडीचशे पेक्षा जास्त कामगारांना अन्नधान्याच्या किटची वाटप केले. तळे हिप्परगा गावात खाणकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच मजूरी करणारे देखील जास्त आहे. अशा कुटुंबाची संख्या ही पाचशेपेक्षा जास्त आहे. पहिल्या टप्प्यात भिंगारे परिवाराने अडीचशे कुटुंबाना अन्नधान्याची मदत केली आहे.